पाउस





आज मी माझ्या घराशी
सलगीने वागत होते,
उपदेशाच्या चार भिंती बाहेर
पाउलच निघत नव्हते.

तो मुसळधार बरसत होता,
जणू माझीच वाट पाहत होता,
कुंपणाच्या आत होते म्हणून,
माझ्यावर रागवला होता.

दाराशी येऊन मी फक्त
त्यालाच एकटक पाहत होते,
पण असे कोरडे मिलन मात्र
त्याला मान्य नव्हते.

उंबरठा ओलांडून अखेरीस मी
कुंपणाबाहेर पडले,
गार थेंब सरीचे झेलून,
ओलीचिंब भिजले.

उशिरा येण्याच खोट कारण
ऐकूनही तो रागवला नव्हता,
कारण माझ्या निरागसपणावर
तो पुरता भाळला होता.

नंतर कोरड आकाश तो गेल्याचा 
इशारा धरणीला देत होत,
अन अंधार्या रात्रीच्या कुशीत
शांतपणे निजत होत.

कळलंच नाही कधी  मला
वेड करून तो विलुप्त झाला
पण वाट पाहण्यासाठी मात्र
भिजलेल्या आठवणी देऊन गेला.

पण तो पून्हा येणार होता,
ढग पून्हा दाटले होते,
पून्हा एकदा मी माझ्या घराशी,
सलगीने वागणार होते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment