वेड मन माझ आज हट्ट करतय .....


वेड मन माझ आज हट्ट करतय 
तुझ्याकडे तुझा थोडा वेळ मागतय 

सकाळी उठल्यावर तुलाच पहायच आहे 
झोपेतून जागी झाल्यावर 

परत तुझ्या कुशीत झोपायच आहे

भर उन्हात तुझ्या सोबत चालायच आहे
चटके बसता उन्हाचे कधी
तुला पदराच्या सावलीत घ्यायच आहे

ऋतु शिवाय पावसाला एकदा बोलवायच आहे
तुझ्यासवे चिम्ब भिजुन
तुझ्या मिठीत विरघलुन जायच आहे

शांत सायंकाली समुद्र किनारी बसायच आहे
अबोलिच्या फुलानी सजलेला गजरा
तुझ्या हाताने माझ्या केसात माळlयचा आहे

पोर्णिमेच्या रात्रि तुझा हाथ हातात घ्यायचा आहे
चंद्राच्या मंद प्रकाशत चमकणार चांदण
तुझ्या सोबत मोजायच आहे

मन माझ तुझ्याकडे इतकाच वेळ मागत आहे
जीवनाच्या प्रत्येक ऋतुमध्ये मला
तुझ्या सोबत जगायच आहे .................

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS