कारण आमच्या नशिबात देवाने प्रेमच लिहिल नाही

कधी कोणी घट्ट मिठीत घेतलच नाही 
रुसले असेल कधी तर कोणी समजावलच नाही 
डोळ्यातील अश्रु स्वताच स्वत पुसले नेहेमी 
कारण आमच्या नशिबात देवाने प्रेमच लिहिल नाही 

माझ्या भेटीची कधी कोणी आसच केली नाही 
तासन तास माझी कधी वाटच पहिली नाही 
नाही दाखवले कधी नयनाना सप्तरंगी स्वप्न कोणी 
कारण आमच्या नशिबात देवाने प्रेमच लिहिल नाही 

हाथात माझा हाथ कोणी कधी घेतलाच नाही 
तुझाच आहे मी अस कधी कोणी बोललच नाही 
नाही घेतली कधी कोणी शपथ माझ्या प्रेमाची 
कारण आमच्या नशिबात देवाने प्रेमच लिहिल नाही 

माझ्या सोबत पावसात कधी कोणी भिजलच नाही 
डोळ्यात डोळे घालून चार शब्द कधी बोललच नाही 
नाही ऐकल्या कधी माझ्या मनातील भावना कोणी 
कारण आमच्या नशिबात देवाने प्रेमच लिहिल नाही 

माझी स्वप्न रंगवत कोणी रात्र रात्र जागलच नाही 
माझ्या सोबत कोणी स्वताच आयुष्य पाहिलच नाही 
नाही आले माझ्या वाचून कोणाच्या नयनी पाणी 
कारण आमच्या नशिबात देवाने प्रेमच लिहिल नाही 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS