हे असं का होत?




हे असं का होत?
मनात नसताना हि का,
हृदयावर डोळे मात करतात,
हळूच कोणी चोरून पाहताच,
क्षणिकच लाजतात.

हे असं का होत?
काही बोलायचे नसताना हि,
मुक्या होठांना शब्दांकुर फुटतात,
अन कोणी समोर येताच,
ते ओठातच श्वास तोडतात.

हे असं का होत?
कोणीतरी अनोळखी 
आपलंस वाटू लागतं,
त्याच्या एका स्पर्शासाठी मन,
मारणारा तोंड देऊ पाहत.

हे असं का होत?
कोमल पाउले कधीकधी,
अनोळख्याच दिशेला धावतात,
कोणी येणार नसले तरी डोळे,
कोणाची तरी  वाट   पाहतात.

हे असं का होत?
जीवनातले सगळे रंग
अनोळखी होतात,
तरी वेड मन  हाथातल्या  रेषांमध्ये,
त्याचे चित्र काढू पाहतात.

हे असं का होत?
तू स्वाती नक्षत्रापरी भासतोस,
माझ्या हृदय रुपी शिंपल्यात
एक थेंब पडताच,
प्रेम मोती चमकू लागतो.

हे इथं  असंच  होत राहावं,
तुझ्या मिलनासाठी, मन चातक व्हावं,
अन प्रेम वर्षावाच्या शोधात
दूर दूर उडत जावं.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment