ऐक न जरा, काही सांगायचय तुला
किती सुण झाले जगण तुझ्याविना
किती सुन्या झाल्यात वाटा
ऐक न जरा, काही सांगायचय तुला
स्पंदन तपासून पहातेय आता
हाथ ठेवून हृदयावर
सारखेच चुकतात ठोके मनाचे
विश्वास न राहिला श्वासावर
हाथ तुझा माझ्या हाथी
अजुनही भासतो मला
ऐक न जरा, काही सांगायचय तुला
रात्र रात्र जागवतात तुझ्या आठवणी
नयना मधून झोपच कुठेतरी हरवली
तुझ्याविना पोर्णिमेची रात्र पण
अवसे समान भासु लागली
एकदा तुझ्या घट्ट मिठीत
निजायचय मला
ऐक न जरा, काही सांगायचय तुला
एकटीच हसते, एकटीच चालते
जे सांगायचय तुला ते स्वताशिच बोलते
स्वप्न जळउन गेली डोळ्यातच
तुझ्याविना त्या आगीत मी पण जळते
तुझ्या डोळ्यानी एक़ा रात्रि
स्वप्न पहायची आहेत मला
ऐक न जरा, काही सांगायचय तुला
आहे जाणीव सगळी मनाला
आधार न उरला तुझा जीवनाला
तुझ्या प्रेमाचा क्षण नि क्षण
कारण बनेल आता जगण्याला
तुझ्याविना कस रे आवरू
आता वेड्या मनाला
ऐक न जरा, काही सांगायचय तुला
ऐक न जरा, काही सांगायचय तुला






