कोणीतरी हवं होत




तू फक्त माझी आहेस असं म्हणणार  कोणीतरी हवं होत 
माझ्यावर हक्क सांगणार कोणीतरी हवं होत,
हवं होत   कोणीतरी माझ्या अश्रूंमध्ये वाहणारं
माझ्या वर स्वतःहून जास्त प्रेम करणार हवं होत

या परक्या जगात आपल बोलणार कोणीतरी हवं होत,
माझ्या स्वप्नांमध्ये रात्र रात्र जागणार कोणीतरी हवं होत
कोणीतरी हवं होत या वेड्या मनाला भुरळ पाडणार,
कोरड्या उन्हात सावली देणार कोणीतरी हवं होत.

कोसळणाऱ्या पावसात मला  कवेत घेणार कोणीतरी हवं होत,
गुलाबी थंडीत घट्ट मिठीत घेणार कोणीतरी हवं होत,
कोणीतरी हवं होत काटेरी रस्त्यातून चालताना साथ देणार,
इंद्रधनूपरी सात रंगाने स्वप्न विणणार कोणीतरी हवं होत

माझे  सगळे हट्ट पुरवणार  कोणीतरी हवं होत,
मनातल्या सगळ्या गोष्टी मला सांगणार कोणीतरी हवं होत,
कोणीतरी हवं होत न सांगता माझ मन समजणार 
ज्याच्यासाठी प्रेमाचा अर्थ म्हणजे मी असेन असं कोणीतरी हवं होत

आकाशगंगेच्या माळेतले तारे ओंझळीत सजवणार कोणीतरी हवं होत,
सात समुद्रापार जरी असले मी तरी धावत येणार कोणीतरी हवं होत,
कोणीतरी हवं होत ज्याला मी आपल सर्वस्व मानल असतं,
त्याच्या नावच कुंकू माझ्या कपाळी सजवणार कोणीतरी हवं होत.

या परक्या जगातल्या एकटेपणाच्या वेदना सांगत होत,
आज देवाकडे मन असंच कोणीतरी आपल मागत होत,
वाटू लागली  सुखं परकी , आनंद परका, स्वप्नही परकी,
म्हणून मन आज एक हक्काचं माणूस मागत होत.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment