निदान




घडलेल्या गोष्टी मनातून काढून  टाकायच्या होत्या
शूल टोचणार्या आठवणी मिटवून टाकायच्या होत्या
जी वाट आपल्याला विसरली होती कधीच
त्या वाटा आयुष्यातून पुसून टाकायच्या होत्या

चूक होती फक्त माझीच मृगजळा मागे धावत होते
मीच  माझ्या स्वप्नांना स्वतःभोवती गुरफटत  होते
माझ्या प्रत्येक रात्रीला करून स्वप्नांच्या हवाली 
नंतर त्यांचाच तुटलेला श्वास हताशपणे पाहत होते

सूर्यास्त झाला होता स्वप्नांचा
अश्रूंचा पण पूर येवून गेला होता
आलेल्या वादळाने मनाचं गावच उध्वस्त झालं
स्वप्नांच्या खान्डोल्या किनार्यावर पडल्या होत्या

ठरवलं होत आता एकही स्वप्न नाही विणायचं
कितीही वेदना झाल्या तरी दुख नाही कुरवालायचं
डोळ्यातील अश्रू आटेपर्यंत रडले होते दुखांवर
स्वतःच आता दुखासमोर हसू नाही करायचं 

 या समस्येवर आता फक्त एकंच निदान होत
मागे वळून त्या वाटेवर  कधीच वळायच नव्हत 
हट्ट  करून बसलं कधी वेड मन  जरी 
जीव गेला तरी त्याच काहीच ऐकायचं नव्हत 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment