बाप्पाला पत्र












मनात आल आज बाप्पाला पत्र लिहाव
जे प्रश्न मनात वादळ करून बसले त्याचं उत्तर मागाव
थोडी त्याची पण खुशाली विचारावी
अन थोड माझ्या मनातल हि त्याला सांगाव

कागद पेन घेवून बसले मी पत्र लिहायला
नमस्ते बाप्पा , तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार
पत्रास कारण कि.... खूप बेचैन झाल आहे मन
अन करायची होती तुझ्याकडे तुझीच थोडी तक्रार,

लहान पणी बाबा बोलले होते मला,
बाप्पाची पूजा केलीस कि तो सगळे स्वप्न पूर्ण करेल
काही चूक करू नकोस हा कधी,
नाहीतर तू झोपल्यावर तो तुझा कान कापेल.

काही चूक केली कि बाप्पा कान टाकेल कापून,
सगळे सवंगडी मग हसतील मला  पाहून,
तेव्हापासून शहाण्या बाळासारखी वागले,
खोड्या करत होते पण राहत होते जरा जपून,

तुझ्या मनासारखं वागूनही तू असं का रे केलंस
सुखा पेक्षा जीवनात तू दुखच जास्त दिलंस
दुखला तुझ्या काही प्रमाणच नाही
पण सुखाच माप का रे एवढंच केलस??

गरीब बिचारी तुझीच न रे लेकर आम्ही
तुझ्याकडेच हट्ट धरणार, तुझ्याशीच भांडणार
तुझ्यावाचून कोणीच नाही आम्हाला
तू असा रागावलास मग कोण आमच्याकडे बघणार

तुला फक्त माझ एवढंच सांगण आहे
तू जरा लक्ष ठेव तुझ्या लेकरांवर,
शहाण्या बाळांचे सगळे हट्ट पुरव तू
अन चुकतात त्यांचे कान काप लवकर

तुझ्या सुखाच माप जरा वाढव थोडस ,
कारण  रेतीसारख हाथातून सुख जात निसटून 
लवकर ये आमच्या हाकेला धावून 
मन थकून जात वेदना सहन करून करून

साथ दे आमची सुखदुखात 
तुझ्याकडे एवढंच मागण आहे
संकटाला सामोर जाण्यासाठी बळ दे
एवढंच बस सांगण आहे

काही चुकल माकल तर माफ कर,
एवढ लिहून मी माझ पत्र संपवते
तुझ्या पदरात घालून घे आमच्या चुका
तुझ्या पत्राची वाट बघते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment