तुझ प्रेम.
Labels:
ह्रुदयाचे ठोके
वणव्याने जळलेल्या
वृक्षाला मोहर देणार,
कोमेजलेल्या कळीला,
नवीन बहर देणार.... तुझ प्रेम,
पावसाची ओली सर बनून
मला भिजवणार,
गारठलेल्या मनाला
आपल्या मिठीची उब देणार..... तुझ प्रेम,
तुझ प्रेम जणू त्या
मोगऱ्याच्या गंधा सारख,
आकाशातल्या इंद्रधनुच्या
रंगासारख...... तुझ प्रेम,
मला रोजच भेटत
कधी हसवत, कधी रडवत,
पण रडवल्यावरही
ओठांवर हसू उमलवत....तुझ प्रेम,
रात्री स्वप्नात येत,
तर कधी रात्र रात्र जागवत,
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
सोबत असत..... तुझ प्रेम,
माझ्या हृदयाची स्पंदन
तुझ्याच प्रेमाचा श्वास घेतात,
वाटतंय आता जीवनच जणू बनलंय
.................तुझ प्रेम.
Posted by
pallu
पाउस
Labels:
मन माझ
आज मी माझ्या घराशी
सलगीने वागत होते,
उपदेशाच्या चार भिंती बाहेर
पाउलच निघत नव्हते.
तो मुसळधार बरसत होता,
जणू माझीच वाट पाहत होता,
कुंपणाच्या आत होते म्हणून,
माझ्यावर रागवला होता.
दाराशी येऊन मी फक्त
त्यालाच एकटक पाहत होते,
पण असे कोरडे मिलन मात्र
त्याला मान्य नव्हते.
उंबरठा ओलांडून अखेरीस मी
कुंपणाबाहेर पडले,
गार थेंब सरीचे झेलून,
ओलीचिंब भिजले.
उशिरा येण्याच खोट कारण
ऐकूनही तो रागवला नव्हता,
कारण माझ्या निरागसपणावर
तो पुरता भाळला होता.
नंतर कोरड आकाश तो गेल्याचा
इशारा धरणीला देत होत,
अन अंधार्या रात्रीच्या कुशीत
शांतपणे निजत होत.
कळलंच नाही कधी मला
वेड करून तो विलुप्त झाला
पण वाट पाहण्यासाठी मात्र
भिजलेल्या आठवणी देऊन गेला.
पण तो पून्हा येणार होता,
ढग पून्हा दाटले होते,
पून्हा एकदा मी माझ्या घराशी,
सलगीने वागणार होते.
Posted by
pallu
हे असं का होत?
Labels:
मन माझ
हे असं का होत?
मनात नसताना हि का,
हृदयावर डोळे मात करतात,
हळूच कोणी चोरून पाहताच,
क्षणिकच लाजतात.
हे असं का होत?
काही बोलायचे नसताना हि,
मुक्या होठांना शब्दांकुर फुटतात,
अन कोणी समोर येताच,
ते ओठातच श्वास तोडतात.
हे असं का होत?
कोणीतरी अनोळखी
आपलंस वाटू लागतं,
त्याच्या एका स्पर्शासाठी मन,
मारणारा तोंड देऊ पाहत.
हे असं का होत?
कोमल पाउले कधीकधी,
अनोळख्याच दिशेला धावतात,
कोणी येणार नसले तरी डोळे,
कोणाची तरी
वाट पाहतात.
हे असं का होत?
जीवनातले सगळे रंग
अनोळखी होतात,
तरी वेड मन
हाथातल्या रेषांमध्ये,
त्याचे चित्र काढू पाहतात.
हे असं का होत?
तू स्वाती नक्षत्रापरी भासतोस,
माझ्या हृदय रुपी शिंपल्यात
एक थेंब पडताच,
प्रेम मोती चमकू लागतो.
हे इथं
असंच होत राहावं,
तुझ्या मिलनासाठी, मन चातक व्हावं,
अन प्रेम वर्षावाच्या शोधात
दूर दूर उडत जावं.
Posted by
pallu
सांगशील का? काय चूक होती माझी?
Labels:
प्रेमभंग
मनापासून प्रेम केल तुझ्यावर,
फक्त आणि फक्त होऊन राहिले तुझी,
अर्ध्या वाटेवर टाकुन गेलास एकटीला,
सांगशील का? काय चूक होती माझी?
फक्त तुझीच आस होती श्वासाना,
तहानले होते मन तुझ्या एका भेटीसाठी,
हृदयाची स्पन्दनच हरवून टाकलीस,
सांगशील का? काय चूक होती माझी?
तुझ्यासोबत पाहिलं होत अवघ आयुष्य,
प्रत्येक वाट तुझ्यासोबतच चालायची होती,
स्वप्नाचा जीव गेला माझ्याच समोर,
सांगशील का? काय चूक होती माझी?
प्रत्येक क्षणी तुझ्या प्रेमाचा श्वास घेते,
तुझवीन आता जगनच जमत नाही,
गेलास नयनाना भेट देवून अश्रुंची,
सांगशील का? काय चुक होती माझी?
श्वास गोंधळू लागले उरी
स्पंदन पण आता उरली नाही,
मनी एकच प्रश्न उठे क्षणोक्षणी,
खरच का रे? चुक होती माझी?
Posted by
pallu
होता एक असाही दिवस
Labels:
प्रेमभंग
होता एक असाही दिवस,
तो माझ्यावर खूप जीव लावायचा,
हरवून जायचा माझ्यामाधेच,
तासान तास बोलत राहायचा,
रुसून मी बसले कधी कि,
अवखळ थट्टा करून हसवायचा,
रागावले जरी कधी मी,
तरी शांतपणे समजवायचा,
तुजवीण जगन माझ व्यर्थ आहे,
सोबत चालताना नेहेमी,
हातात हाथ गुंफायचा,
अंधार्या वाटेवर हि सोबत आहे तो,
हा विश्वास मनी असायचा,
माझीच दृष्ट लागली जणू माझ्या प्रेमाला,
एक दिवस असाही होता,
कि तो माझ्यावर खूप प्रेम करायचा,
आणि आज असाही दिवस आहे कि,
प्रत्येक दिवस त्याच्या आठवणीतच जगायचा.
Posted by
pallu
बाप्पाला पत्र
Labels:
मन माझ
मनात आल आज बाप्पाला पत्र लिहाव
जे प्रश्न मनात वादळ करून बसले त्याचं उत्तर मागाव
थोडी त्याची पण खुशाली विचारावी
अन थोड माझ्या मनातल हि त्याला सांगाव
कागद पेन घेवून बसले मी पत्र लिहायला
नमस्ते बाप्पा , तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार
पत्रास कारण कि.... खूप बेचैन झाल आहे मन
अन करायची होती तुझ्याकडे तुझीच थोडी तक्रार,
लहान पणी बाबा बोलले होते मला,
बाप्पाची पूजा केलीस कि तो सगळे स्वप्न पूर्ण करेल
काही चूक करू नकोस हा कधी,
नाहीतर तू झोपल्यावर तो तुझा कान कापेल.
काही चूक केली कि बाप्पा कान टाकेल कापून,
सगळे सवंगडी मग हसतील मला पाहून,
तेव्हापासून शहाण्या बाळासारखी वागले,
खोड्या करत होते पण राहत होते जरा जपून,
तुझ्या मनासारखं वागूनही तू असं का रे केलंस
सुखा पेक्षा जीवनात तू दुखच जास्त दिलंस
दुखला तुझ्या काही प्रमाणच नाही
पण सुखाच माप का रे एवढंच केलस??
गरीब बिचारी तुझीच न रे लेकर आम्ही
तुझ्याकडेच हट्ट धरणार, तुझ्याशीच भांडणार
तुझ्यावाचून कोणीच नाही आम्हाला
तू असा रागावलास मग कोण आमच्याकडे बघणार
तुला फक्त माझ एवढंच सांगण आहे
तू जरा लक्ष ठेव तुझ्या लेकरांवर,
शहाण्या बाळांचे सगळे हट्ट पुरव तू
अन चुकतात त्यांचे कान काप लवकर
तुझ्या सुखाच माप जरा वाढव थोडस ,
कारण रेतीसारख हाथातून सुख जात निसटून
लवकर ये आमच्या हाकेला धावून
मन थकून जात वेदना सहन करून करून
साथ दे आमची सुखदुखात
तुझ्याकडे एवढंच मागण आहे
संकटाला सामोर जाण्यासाठी बळ दे
एवढंच बस सांगण आहे
काही चुकल माकल तर माफ कर,
एवढ लिहून मी माझ पत्र संपवते
तुझ्या पदरात घालून घे आमच्या चुका
तुझ्या पत्राची वाट बघते.
Posted by
pallu
कोणीतरी हवं होत
Labels:
ह्रुदयाचे ठोके
तू फक्त माझी आहेस असं म्हणणार कोणीतरी हवं होत
माझ्यावर हक्क सांगणार कोणीतरी हवं होत,
हवं होत कोणीतरी माझ्या अश्रूंमध् ये वाहणारं
माझ्या वर स्वतःहून जास्त प्रेम करणार हवं होत
या परक्या जगात आपल बोलणार कोणीतरी हवं होत,
माझ्या स्वप्नांमध्ये रात्र रात्र जागणार कोणीतरी हवं होत
कोणीतरी हवं होत या वेड्या मनाला भुरळ पाडणार,
कोरड्या उन्हात सावली देणार कोणीतरी हवं होत.
कोसळणाऱ्या पावसात मला कवेत घेणार कोणीतरी हवं होत,
गुलाबी थंडीत घट्ट मिठीत घेणार कोणीतरी हवं होत,
कोणीतरी हवं होत काटेरी रस्त्यातून चालताना साथ देणार,
इंद्रधनूपरी सात रंगाने स्वप्न विणणार कोणीतरी हवं होत
माझे सगळे हट्ट पुरवणार कोणीतरी हवं होत,
मनातल्या सगळ्या गोष्टी मला सांगणार कोणीतरी हवं होत,
कोणीतरी हवं होत न सांगता माझ मन समजणार
ज्याच्यासाठी प्रेमाचा अर्थ म्हणजे मी असेन असं कोणीतरी हवं होत
आकाशगंगेच्या माळेतले तारे ओंझळीत सजवणार कोणीतरी हवं होत,
सात समुद्रापार जरी असले मी तरी धावत येणार कोणीतरी हवं होत,
कोणीतरी हवं होत ज्याला मी आपल सर्वस्व मानल असतं,
त्याच्या नावच कुंकू माझ्या कपाळी सजवणार कोणीतरी हवं होत.
या परक्या जगातल्या एकटेपणाच्या वेदना सांगत होत,
आज देवाकडे मन असंच कोणीतरी आपल मागत होत,
वाटू लागली सुखं परकी , आनंद परका, स्वप्नही परकी,
म्हणून मन आज एक हक्काचं माणूस मागत होत.
Posted by
pallu
निदान
Labels:
प्रेमभंग
घडलेल्या गोष्टी मनातून काढून टाकायच्या होत्या
शूल टोचणार्या आठवणी मिटवून टाकायच्या होत्या
जी वाट आपल्याला विसरली होती कधीच
त्या वाटा आयुष्यातून पुसून टाकायच्या होत्या
चूक होती फक्त माझीच मृगजळा मागे धावत होते
मीच माझ्या स्वप्नांना स्वतःभोवती गुरफटत होते
माझ्या प्रत्येक रात्रीला करून स्वप्नांच्या हवाली
नंतर त्यांचाच तुटलेला श्वास हताशपणे पाहत होते
सूर्यास्त झाला होता स्वप्नांचा
अश्रूंचा पण पूर येवून गेला होता
आलेल्या वादळाने मनाचं गावच उध्वस्त झालं
स्वप्नांच्या खान्डोल्या किनार्यावर पडल्या होत्या
ठरवलं होत आता एकही स्वप्न नाही विणायचं
कितीही वेदना झाल्या तरी दुख नाही कुरवालायचं
डोळ्यातील अश्रू आटेपर्यंत रडले होते दुखांवर
स्वतःच आता दुखासमोर हसू नाही करायचं
या समस्येवर आता फक्त एकंच निदान होत
मागे वळून त्या वाटेवर कधीच वळायच नव्हत
हट्ट करून बसलं कधी वेड मन जरी
जीव गेला तरी त्याच काहीच ऐकायचं नव्हत
Posted by
pallu
Subscribe to:
Posts (Atom)






















