आज मला तो किती दिवसाने भेटला
आता काही उरल नाही आपल्यात सहजपणे बोलला
बोलला आज शेवटच मला पाहून घे
जे काही बोलयचय ते आताच बोलून घे
पण तुला कस सांगू मी
कस रे एका नजरेत तुला साठवता येईल
किती काही सांगायचय तुला
एका भेटीत कस रे सांगता येईल
तू नसशील तेव्हा कोणावर इतक प्रेम करू
तू नसशील तेव्हा कोणाची रे वाट बघू
एकट्या पडतील रे आयुष्याच्या सगळ्याचा वाटा
तू नसशील तर चालताना कोणाचा हाथ हाथात घेवू
मन माझ त्याला विनवत होत
पण त्याने तर मला कधीच परक केल होत
सांगत होता तो मला, आपले मार्ग आता वेगळे आहेत
पण माझ मन मात्र काहीच ऐकत नव्हत
भिजलेल्या डोळ्यांनी मी त्याचा हाथ हाथात घेतला
जगू शकशील का रे मजविन??? हा प्रश्न केला
त्याने मात्र तेव्हा फक्त अबोलाच धरला
हाथ माझा सोडून पाठ वळवून निघून गेला
माझ्या डोळ्यांच्या अश्रुंखातर
थोड तरी थांबायचं होतस ना
नाही जगू शकत मी तुझ्याविना
जरा समजून तरी घ्यायचं होतस ना







0 comments:
Post a Comment